आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होमिओपॅथिक डॉक्टर्स आजपासून संपावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यातील होमिओपॅथिक व आयुर्वेदिक व्यवसाय करणार्‍या डॉक्टरांना अँलोपॅथिक औषधी न देण्याच्या औषधी विक्रेत्यांच्या भूमिकेच्या विरोधात राज्यातील 30 हजार होमिओपॅथिक डॉक्टर संपावर जात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पाचशे डॉक्टरांचा यात समावेश आहे.
राज्याच्या ग्रामीण भागासह शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये 30 हजार होमिओपॅथिक डॉक्टर्स काम करतात. राज्यातील 321 तालुक्यातील 17 तालुक्यांमध्ये एकही खासगी एमबीबीएस डॉक्टर नाही. राज्यातील 35 आरोग्य केंद्रावर रात्रीचा वैद्यकीय अधिकारी नसून, 380 प्राथमिक आरोग्य केंद्रावर अधिकारी निवास करीत नाहीत. दोनशे खेड्यांवर सतत सेवा देणारे चार व साडेपाच वर्षे अभ्यासक्रम पूर्ण केलेल होमिओपॅथिक अधिकारी आहेत. होमिओपॅथिक डॉक्टरांना अँलोपॅथीची सुविधा नाकारल्यास शासनास 25 हजार एमबीबीएस डॉक्टर तात्काळ उपलब्ध करावे लागतील. डॉक्टरांच्या संपास होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. पवन डोंगरे, औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉ.बाळासाहेब पवार, डॉ.दिलीप बने, डॉ. शिवाजी बनसोडे, डॉ. प्रतिभा बने, होमिओपॅथिक इंटेग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे डॉ. प्रकाश झांबड आदींनी पाठिंबा दर्शविला आहे.