आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापडलेले पैसे ठाण्यात जमा, जयभवानी विद्यामंदिरच्या शिक्षकाचा प्रामाणिकपणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रस्त्यावर पडलेले साडेपाच हजार रुपये शिक्षक सुहास विठ्ठल अंबेकर यांनी पोलिस ठाण्यात जमा करून आदर्श निर्माण केला आहे. शनिवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास रेणुकामाता मंदिर ते चाटे स्कूलदरम्यान रस्त्यावर नोटा पडल्या होत्या. या वेळी जयभवानी विद्यामंदिर शाळेतील शिक्षक सुहास विठ्ठल अंबेकर दुचाकीवरून जात होते. त्यांना रस्त्यावर पैसे पडल्याचे दिसले.
त्यांनी ते जमा केले. याचदरम्यान २० ते २५ जण रस्त्यावर पैसे गोळा करत होते. अंबेकर यांनी पुढाकार घेत हे पैसे जमा केले. एकूण पाच हजार चारशे रुपये जमा झाले. मात्र, या पैशांचा धनी कोण, हे समजले नसल्याने त्यांनी सर्व नोेटा जमा करून "दिव्य मराठी' कार्यालय गाठून ही बाब लक्षात आणून दिली. "दिव्य मराठी'च्या कर्मचाऱ्यांनी याबाबत सातारा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांना माहिती दिली. अंबेकर यांनी सर्व रक्कम पोलिसांत जमा केली. प्रजापती त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.