आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

131 गावांतील पावणेतीन लाख लोकांना टँकरने पाणी, जिल्ह्यात भीषण परिस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पावसाने ओढ दिल्याने औरंगाबाद जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. १७ ऑगस्टअखेर केवळ २२० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात १३१ गावांतील पावणेतीन लाख लोकांना १४३ टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. 

मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाऊस नसल्यामुळे पिके वाळून गेली आहेत. आता पिण्यासाठी टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ४६ गावातील लाख ३९ हजार लोकांना ४३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पैठण तालुक्यातील ३५ गावांत ६५१९६ लोकांना ४१ टँकरने, औरंगाबाद तालुक्यातील २५ गावे आणि वाड्यात ३१६२३ लोकांना ३० टँकरने, वैजापूर तालुक्यातील १० गावांना टँकरने, सिल्लोड गावांना ११ टँकरने तर फुलंब्रीतील गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

पैठण तालुक्यात सर्वात कमी पाऊस 
पैठणतालुक्यात सर्वात कमी १०७ मिमी पाऊस झाला आहे. ३५१ मिमी पाऊस अपेक्षित असताना केवळ ३० टक्केच पाऊस झाला आहे. गंगापूर तालुक्यात अपेक्षित पाऊस ३२५ मिमी असताना केवळ १५३ मिमी पाऊस झाला आहे. हे प्रमाण ४७ टक्के आहे. खुलताबाद तालुक्यात ४६६ मिमी अपेक्षित असताना १८२ मिमी पाऊस झाला आहे. हे प्रमाण ३९ टक्के आहे. औरंगाबाद २०७, सोयगाव १९३, वैजापूर २३५, फुलंब्री २८३, कन्नड २८६ आणि सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ३३० मिमी पाऊस झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...