आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hospital News In Marathi, Cancer Hospital Issue At Aurangbad, Divya Marathi

कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दीडशे रुग्ण प्रतीक्षेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शासकीय कर्करोग रुग्णालयात दीडशे रुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत आहेत. बहुतांश रुग्णांना बाहेरूनच औषधी खरेदी करावी लागतात. बाहेरगावच्या रुग्णांना नावनोंदणीसाठी नुसत्या तारखा दिल्या जात असल्यामुळे त्यांची आणि नातेवाइकांची हेळसांड होत आहे.

खासगी रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांना उपचार घेणे अशक्य असल्यामुळे अनेकांचा ओढा शासकीय कर्करोग रुग्णालयाकडे असतो. मराठवाड्यासह राज्यभरातून रुग्ण उपचार येतात. रुग्णांच्या तुलनेत सुविधा अपुर्‍या पडत आहेत. बाहेरगावच्या रुग्णांना नोंदणी अनिवार्य आहे. असे न केल्यास त्यांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागते. रुग्णांची हेळसांड थांबवण्यात यावी, अशी मागणी भागाबाई शिंदे, संगीता हरदास, निवृत्ती कांबळे, रघुनाथ म्हैसमाळे यांनी केली.

पेशंटचे रजिस्ट्रेशन होत नाही : राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी दररोज 30 ते 35 रुग्ण येतात. यापैकी 10 किंवा 12 रुग्णांचे रजिस्ट्रेशन केले जाते. उर्वरित 13 ते 20 रुग्ण प्रतीक्षेत असतात. रजिस्ट्रेशननंतर उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

24 तास सेवा
24 तास सेवा दिली जाते. दररोज 100 ते 110 रुग्ण येतात. त्यापैकी 40 ते 60 रुग्णांवर रेडिओथेरपी केली जाते. राजीव गांधी योजनेचा लाभ घेणार्‍या बहुतांश रुग्णांकडे कागदपत्रांचा अभाव असतो. दिवसभरात 10 ते 15 रुग्णांचे रजिस्ट्रेशन केले जाते. मनुष्यबळ पुरेसे आहे. डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्यकारी अधिकरी

माझी मेहुणी संगीता हरदास या कर्करोगाच्या रुग्ण आहेत. त्यांच्या उपचारासाठी येथे आलो, पण मला केवळ तारखाच मिळत गेल्या. त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावत आहे. सेवेस विलंब होत असल्यामुळे रुग्णाचे धैर्य खचत आहे.- जनार्दन तपकिरे, रुग्णाचे नातेवाईक

मुलाला गाठीचा कॅन्सर आहे. मला काही लिहिता-वाचता येत नाही. ते जसे सांगतात तसे आम्ही करतो, पण चकरा मारून आम्ही थकलो आहोत.- भागाबाई शिंदे रुग्णाचे नातेवाईक

माझ्या पत्नीला उपचारासाठी दाखल केले आहे. नावनोंदणीसाठी संघर्ष करावा लागला. औषधी बाहेरून खरेदी करावी लागतात, पण कागदपत्रे जोडण्यासच विलंब लागतो. रघुनाथ म्हैसमाळकर, रुग्णाचे नातेवाईक