आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत अनुभवा हाॅट एअर बलूनची सफर, एप्रिलपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणे शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/खुलताबाद - साहसी क्रीडाप्रकार हाॅट एअर बलूनची सफर आता औरंगाबादेतही अनुभवता येणार आहे. फुग्यात बसून हवेत उडण्याची संधी पर्यटकांना देणारे औरंगाबाद हे जयपूर, लोणावळ्यानंतर देशातील तिसरे शहर ठरेल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) व हाॅटेल संघटनेचा यासाठी पुढाकार आहे. सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी भांगसीमाता गड, दौलताबाद, शूलिभंजन, म्हैसमाळ येथे पाहणी केली. निवड होणाऱ्या स्थळी आॅक्टोबरपासून काम सुरू होऊन एप्रिलपर्यंत संपेल.

पर्यटन जिल्हा झालेल्या औरंगाबादेत नवनव्या सुविधा देण्याचे प्रयत्न आहेत. दिल्लीतील स्कायवाॅल्ट्झ बलून सफारी कंपनी ही सेवा देते. राज्यात काम पाहणाऱ्या पुण्याच्या रेनबो रायडर्सचे संग्राम पवार रविवारी औरंगाबादेत होते. लोणावळ्यात २ वर्षांपासून अडीच हजार लोकांनी बलून सफारी केली. येथे सध्या दोन महिन्यांचे वेटिंग आहे. सध्या टर्की देश हाॅट एअर बलूनची राजधानी म्हणून ओळखला जातो. येथील कॅपिडोकिया शहरात दिवसाला १५० बलून उडतात.

फुगा नव्हे, एअरक्राफ्ट
{ आॅक्टोबर ते एप्रिल काळात बलूनचा सीझन चालतो. पाऊस चालत नाही. सूर्योदयाची वेळ सफारीसाठी योग्य
{ विमान प्राधिकरण व नागरी विमान मंत्रालयाची (डीजीसीए) परवानगी लागते. कागदोपत्री फुग्याची नोंद एअरक्राफ्ट हाेते.
{ बलून उडवण्यासाठी सर्टिफाइड पायलट लागतो. नगरचे कॅ. धवल केदार ७ वर्षांपासून जयपूरला पायलट आहेत.
{ औरंगाबादेत बलूनमधून एकाच वेळी म्हैसमाळ, शूलिभंजन व दौलताबादचा एरियल व्ह्यू पाहता येणार आहे.

असा उडतो फुगा
लोणावळ्यात ४ हजार फुटांवर उडता येते. वाऱ्याच्या दिशेने उडणारा फुगा हवा सोडून वा भरून पायलट वर-खाली करतो. फुग्यावर बर्नर असते. ते एलपीजीने गरम केले जाते. गरम हवा फुग्यात भरली जाते. थंड हवेपेक्षा हलकी असल्याने फुगा वर जातो. वर जाणे व खाली येण्यासाठी प्रत्येकी २५ मिनिटे लागतात.

तासभर राइड, १२ हजार खर्च
बलून तासाभराच्या सफरीत १२ कि.मी.ची फेरी मारणार आहे. एका बलूनमध्ये ५ वर्षांवरील ८ ते ९ जण बसू शकतात. या राइडसाठी पर्यटकांना प्रत्येकी १२ हजार रुपये खर्च येणार आहे.