आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील 9 चित्रपटगृहांत झाले बाहुबलीचे 100 शो; सर्वच शो हाऊसफुल्ल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘कटप्पानेबाहुबलीला का मारले’ या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी शुक्रवारी(२८एप्रिल) सकाळी 7 वाजेपासून चित्रपटगृहांत गर्दी झाली होती. सोमवारपासूनच चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग करण्यात आले. सकाळी आठच्या खेळासाठी मुलाबाळांसह प्रेक्षकांनी चित्रपटगृहे गाठली. या चित्रपटगृहांत दिवसभरात १०० शो झाले. सर्वच शो हाऊसफुल्ल गेले. पुढील तीन दिवसांचे खेळही हाऊसफुल्ल झाले आहेत. 

बाहुबलीच्या भव्यदिव्यतेचा अनुभव डोळ्यांत साठवण्यासाठी शहरातील नऊ चित्रपटगृहांत १०० खेळ आयोजित करण्यात आले होते. पहिल्यांदाच सर्व खेळांचे १०० टक्के अॅडव्हान्स बुकिंग झाल्याचे चित्रपट क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले. नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागातील भव्यदिव्यता पाहणे हा भारतीय प्रेक्षकांसाठी अद््भुत अनुभव होता. त्यातही कहाणीतील रोमांच अन् रहस्य उत्सुकता ताणून ठेवण्यात महत्त्वाचे ठरले. मल्टिस्क्रीन आणि डॉल्बी म्युझिक सिस्टिम असलेल्या चित्रपटगृहांत पहिल्याच दिवशी चित्रपटाचे १०० खेळ झाले. चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेऊन सकाळी वाजेपासूनच खेळ ठेवण्यात आले होते. 

चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासून क्षणोक्षणी शिट्ट्या अन् जल्लोष केला जात होता. डोळ्याचे पारणे फिटावे असे भव्य सेट्स आणि कल्पकतेसोबतच कॅमेऱ्याचे जबरदस्त अँगल्स पाहण्यासाठीही अनेकांनी चित्रपटाला हजेरी लावली. कथानक, अभिनय किंवा गाणी चांगली नसली तरी नुसते चित्रीकरण पाहूनही आनंद घ्यावा असा काहींचा उद्देश होता. पण उत्सुकता शिगेला पोहोचवून भ्रमनिरास होण्याचा प्रकार यात घडला नाही. दुसरा भाग पहिल्यापेक्षाही सुंदर झाला, अशीच अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवली. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त आणि पूर्वजांना आवाहनाचा एक महत्त्वाचा दिवस असतानाही अनेक महिला चित्रपट बघण्यासाठी आवर्जून हजर राहिल्या. बाहुबलीच्या लोकप्रियतेमुळे अनेक वर्षांनंतर असा प्रकार चित्रपटगृह मालक-व्यवस्थापकांनी अनुभवला. 

सर्वाधिक ई-टिकेट बुकिंग 
अनेकवर्षांनंतर या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात अॅडव्हान्स बुकिंग झाले. पण पूर्वी चित्रपटगृहांबाहेर रांगा लावून लोक तासन््तास तिष्ठत उभे असायचे तो ट्रेंड आता ई-बुकिंगमुळे कालबाह्य झाला आहे. 

फक्त बाहुबलीच 
शहरातीलसर्व चित्रपटगृहांत सर्व स्क्रीन्सवर सर्व शो बाहुबलीचेच आहेत. अन्य कोणताही चित्रपट उपलब्ध नाही. बाहुबलीची सर्व तिकिटे तीन दिवस बुक आहेत. 
बातम्या आणखी आहेत...