आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्र्यांच्या छताखाली २३ बेघर, पंखे, कूलर बंद, टॉयलेट वापरासाठी आकारले जातात पैसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पत्र्याचे छत असलेल्या मोठ्या हॉलमध्ये उन्हाच्या झळा सहन करत एकाच केविलवाण्या पंख्याची हवा घेत झोपण्याचा ते २३ जण प्रयत्न करत होते. जुनाट, कुबट वासाच्या गाद्या, उशांचा पत्ता नाही, कूलरची पिन काढून ठेवल्याने कोमट पाण्यावर तहान भागवावी लागत होती. कहर म्हणजे रात्रीच्या वेळी टॉयलेटचा वापर करण्यासाठी चक्क तीस रुपये आकारून कुलूप उघडले जाते. हे चित्र आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मनपाने सुरू केलेल्या महापालिकेचे नवीन सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी सोमवारी मध्यरात्री पत्रकारांना सोबत घेत मनपाच्या रात्र निवारागृहांना अचानक भेटी दिल्या. त्या वेळी त्यांना तेथे भयानक अवस्था पाहायला मिळाली. शहरात राहणाऱ्या गरीब बेघरांना उघड्यावर राहावे लागू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांना रात्र निवारागृहे उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुरू करण्यात आलेल्या दहा निवारागृहांपैकी तीन निवारागृहांना जंजाळ यांनी मध्यरात्री भेट देत पाहणी केली.
रेल्वे स्टेशनच्या संत गाडगेबाबा मंगल कार्यालयातील निवारागृह, एन-६ सिडकोतील आकाश सभागृहातील निवारागृह हर्सूल येथील निवारागृह अशा तीन ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. या गृहांचे रजिस्टर तपासले, गाद्या-चादरी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, विजेची सोय यांची अवस्था त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. ही अवस्था पाहून त्यांनी आज मनपात बैठक बोलावली होती; पण ज्यांच्याकडे निवारागृहांची जबाबदारी आहे, ते भालचंद्र पैठणे आले नाहीत. त्याऐवजी त्यांनी बी. व्ही. जोशी यांना पाठवून दिले. त्यामुळे आता उद्या या विषयावर बैठक होणार आहे.
पुढील स्लाइडसवर क्लिक करून जाणून घ्या नागरिकांच्या समस्या...
बातम्या आणखी आहेत...