आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाजाची फळी तोडून चोरले 25 तोळे सोने, रोख रक्कम; देवळाईतील बंगल्यावर भरदिवसा दरोडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देवळाईतील अरुणोदय कॉलनीत चोरट्यांनी भरदिवसा रो बंगलोच्या दरवाजाची फळी तोडून २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २५ हजार रोख मोबाइल चोरून नेला. व्यंकटराव बाजीराव पवार यांच्या घरात हा प्रकार घडला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. 
 
पवार हे कर सल्लागार आहेत. गुरुवारी ते बाहेर गेल्यानंतर त्यांची पत्नी मुलगी दुपारी बाराच्या सुमारास खरेदीसाठी बाजारात गेल्या होत्या. या दरम्यान, चोरांनी त्यांच्या बंगल्याच्या समोरील दरवाजाच्या खालची फळी तोडत घरात प्रवेश केला. आतील खोलीतील कपाटात ठेवलेले २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २० ते २५ हजार रुपयांची रोख आणि मोबाइल चोरून नेला. सातारा पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलिस, गुन्हे शाखेचे पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान समोरून घराच्या मागच्या बाजूपर्यंत जात तेथेच घुटमळले. यात लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. परंतु प्रत्यक्षात मात्र २५ तोळे सोने इतर ऐवज असा दहा लाखांच्या वर ऐवज चोरीला गेल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
पोलिस चौकी बंदच : काही महिन्यांपूर्वी सातारा पोलिस ठाण्याच्या लोेकसंमेलनात अरुणोदय कॉलनीच्या नागरिकांनीच घरफोड्यांची तक्रार करत बंद पोलिस चौकी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. त्या वेळी आयुक्त यशस्वी यादव यांनी निरीक्षक भरत काकडे यांना आठ दिवसांत पोलिस चौकी सुरू करून तेथे कायमस्वरूपी एका उपनिरीक्षकाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. परंतु महिना उलटूनही चौकी बंदच असल्याचे स्थानिकांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...