आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत टू बीएचके फ्लॅट, घरे फॉर्मात; सात प्रमुख शहरांत मात्र मागणीत घट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- देशातील सात प्रमुख शहरांत गेल्या वर्षभरात घरांच्या मागणीत ३० टक्के घट आली आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या औरंगाबादेत मात्र याउलट कल आहे. या संदर्भात औरंगाबाद क्रेडाईचे माजी सचिव रवि वट्टमवार यांनी सांगितले, देशात घरांच्या मागणीत घट आली असली तरी औरंगाबादेत मात्र १० ते ४० लाखांदरम्यानच्या घरांना चांगली मागणी आहे. दिवाळी-दसऱ्यात चांगले बुकिंग झाले.

औरंगाबादेत टू - बीएचकेला मागणी
औरंगाबादेत १००० स्क्वेअर फुटांच्या व त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रफळाच्या टू-बीएचकेला चांगली मागणी असून सध्या सुरू असणाऱ्या प्रकल्पांत ६५ %प्रमाण टू -बीएचकेचे असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष पापालाल गोयल यांनी दिली.
सध्या वन बीएचकेचे प्रमाण १५ टक्के, तर ३ बीएचकेचे प्रमाण सरासरी १० टक्के आहे.
सिंगल हाऊस अर्थात बंगले आणि ड्युप्लेक्सचे प्रमाण ५ टक्के आहे.
सध्या १० ते २५ लाखांपर्यंतच्या टू-बीएचकेला मोठी मागणी. मोक्याच्या ठिकाणी टू-बीएचकेच्या किमती ४० ते ५० लाखांपर्यंत. किमती वर्षभरापासून स्थिर आहेत.

चित्र बदलणार
वट्टमवार म्हणाले, यंदाच्या वर्षाची सुरुवातच व्याजदर कपातीने झाली आहे. त्यामुळे बुकिंगसाठी चौकशीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. आगामी काळात गृहकर्ज आणखी स्वस्त होईल, त्यामुळे यंदा औरंगाबादेत घरांना चांगली मागणी राहील

चढ्या किमती, उच्च व्याजाचा परिणाम
वार्षिक तुलनेत देशातील घरांच्या मागणीत ३० टक्के घट झाली आहे. घरांच्या चढ्या किमती, उच्च व्याजदर व सतर्क ग्राहक यामुळे ही घट झाली आहे.
- अंशुमन मॅगेझीन, सीएमडी, सीबीआरई, दक्षिण आशिया

पुणे, मुंबईत 30% घट
2014 मध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे येथे घरांच्या मागणीत 30 टक्के घट आली आहे. या क्षेत्रातील सल्लागार सीबीआरईने केलेल्या पाहणीत हे स्पष्ट झाले.