आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ - आणखी किती होणार शहीद? एकदाचा प्रश्न निकाली काढा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 वेरूळ : आमची मुले देशासाठी शहीद झाली याचा आम्हाला अभिमान आहे; परंतु अजून किती मुले शहीद होणार, असा सवाल उपस्थित करत शिवरायांच्या शिकवणीतून एकदाचा दहशतवाद संपवून काश्मीर प्रश्नाचा एकदाच काय तो निकाल लावा, असे उद्गार शहीद जवानांच्या माता-पित्यांनी वेरूळ येथे काढले. श्री संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या आश्रमामध्ये धर्मपीठाचे उत्तराधिकारी शांतीगिरी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धर्मयोद्धा संघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शहीद जवानांच्या माता-पित्यांचा ऋणनिर्देश सोहळा शुक्रवारी (दि. २८) संध्याकाळी पार पडला त्या वेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 
या सोहळ्यात उरी येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २० जवानांच्या तसेच अपघाती निधन झालेल्या धर्मयोद्धा संघाच्या दोन युवकांचे माता-पिता, पत्नी यांचा सन्मानपत्र देऊन ऋणनिर्देश व्यक्त केले. या वेळी बजरंग दलाचे क्षेत्रीय महामंत्री शंकर गायकर , हिंदू जनजागरण समितीच्या प्रवक्त्या प्रियंका लोणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकृती ठीक नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन केले. या वेळी जनार्दन स्वामींच्या पालखीची मिरवणूक काढून शहाजीराजे भोसले स्मारक येथे व मालोजीराजे भोसलेंच्या समाधीचे पूजन केले. या वेळी अण्णा हजारे यांचे प्रतिनिधी अॅड. अविनाश औटे, बोर्डे नाना, सदाशिव जाधव, संचालक द्वारकादास श्यामकुमार, मच्छिंद्र देवकर, गणेश अधाने, अप्पासाहेब कुडेकर,   राजेंद्र पवार, झुंबरशेठ मोडके, धर्मयोद्धाचे अध्यक्ष नागेश्वरानंद,  कैलास कुऱ्हाडे, के. बी. भामरे, विष्णू महाराज, बाळासाहेब गवळी, शिवाभाऊ अंगुलगावकर, राजेंद्र चव्हाण, जनार्दन अधाने, जनार्दन रिठे, भिकन आल्हाड आदी उपस्थित होते.
 
आता पुरस्कार परत का नाही होत :  गायकर   
देशात असहिष्णुता सांगत अनेकांनी आपले पुरस्कार परत करण्याची भाषा केली. पंरतु जवान शहीद होत आहेत, मग या मुद्द्यावर कुणी पुरस्कार का परत करत नाहीत. 
बातम्या आणखी आहेत...