आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्रम मोडीत: बारावीत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ३.३३ टक्क्यांनी वाढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालाने आजवरचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. विभागाचा एकूण निकाल ९१.७७ टक्के लागला असून औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९२ टक्के लागला. या परीक्षेत ९४.३८ टक्के मुली आणि ९०.५८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे ३.३३ टक्क्यांनी मुलींच्या उत्तीर्णतेत वाढ झाली आहे, अशी माहिती बोर्डाचे सचिव प्र. श. पठारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी विभागातून एकूण लाख २६ हजार ०५० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी लाख १५ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, तर औरंगाबाद जिल्ह्यातून ४६ हजार ७३९ जण परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४२ हजार ९१८ जणांनी परीक्षा दिली. जिल्ह्याचा एकूण निकाल ९२ टक्के लागला आहे.
यंदाच्या निकालात बीड जिल्हा नंबर वन राहिला असून बीडचा निकाल ९२.५६ टक्के लागला आहे. बीड जिल्ह्यातून ३२ हजार १६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ हजार ७७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल ९२.५६ टक्के लागला आहे.
१० मिनिटे अधिकचा फायदा
यंदाचानिकाल सर्वाधिक लागला आहे. या निकालाचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना तणावमुक्त होण्यासाठी दहा मिनिटे अगोदर देण्यात आलेली उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका याचा फायदा झाला. यामुळे पेपर वेळेत सोडवता आला. पेपर सुरू होण्यापूर्वी जो ताणतणाव विद्यार्थ्यांना वाटत होता, तो दूर करण्यास मदत मिळाली आहे.
दोनवेळा श्रेणी सुधार परीक्षा
या परीक्षेत कमी अथवा मनासारखे गुण मिळाले नाहीत म्हणून काही विद्यार्थी पुन्हा परीक्षेला बसत असत. अशा विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार पद्धत लागू करत पुन्हा परीक्षा देण्यासाठी एक संधी देण्यात येईल, असा नियम दोन वर्षांपूर्वी लागू करण्यात आला आहे. आता यात बदल करण्यात आला असून एकऐवजी आता दोन वेळा श्रेणी सुधार परीक्षा देता येणार आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी
जिल्हा परीक्षार्थी उत्तीर्ण टक्केवारी
औ.बाद ४६६५१ ४२९१८ ९२ टक्के
बीड ३२१६९ २९७७५ ९२.५६ टक्के
परभणी १८४७० १६८५४ ९१.२५ टक्के
जालना १९४३३ १७५३९ ९०.२५ टक्के
हिंगोली ९३२७ ८५९३ ९२.१३ टक्के
एकूण १२६०५० ११५६७९