आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानव अधिकारासंबंधी कार्यशाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- व्ही. एन. पाटील विधी महाविद्यालयात "मानव अधिकार कायदा : बदलते स्वरूप व भविष्यातील आव्हाने' या विषयावर कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेस देशभरातील विविध राज्यांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून निरमा युनिव्हर्सिटी गुजरात येथील डॉ. पूर्वी पोखरियाल उपस्थित होत्या. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अँड. व्ही. डी. साळुंके, डॉ. व्ही. एम. मोरे, आंध्र प्रदेशचे डॉ. चंद्रपॉल, प्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी, प्राचार्य सी. एम. राव, डॉ. बेग, मिलिंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेच्या समारोप सत्रात अँड. सतीश तळेकर, डॉ. कोकाटे, प्रवीण जोशी, अँड. डी. टी. देवळे आदींची उपस्थिती होती.