आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठातील नऊ विभाग असलेल्या ह्युमॅनिटीज बिल्डिंगच्या स्लॅबला क्रॅक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ह्युमॅनिटीज बिल्डिंगच्या स्लॅबला क्रॅक गेला आहे. २००८ मध्ये झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत नियमित दुरुस्ती करून वापरता येईल, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, त्यावर एकदा दुरुस्ती झाली, पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली. पन्नास वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी गैरसोयीची होत आहे. स्वच्छतागृहांमध्ये पाणी तुंबणे, सर्वत्र दुर्गंधी पसरणे आदी समस्यांनी हा परिसर घेरला गेला आहे.

विद्यापीठाची स्थापना ज्या विभागांच्या भरवशावर झाली होती, ते बहुतांश विभाग या इमारतीमध्ये आहेत. सव्वाशे प्राध्यापक इतर कर्मचारी आणि हजार विद्यार्थ्यांना या इमारतीमध्ये यावे लागते. मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्रासारखे महत्त्वाचे विभागही याच इमारतीमध्ये आहेत. १९६८ मध्ये या इमारतीची बांधणी झाली. विटांऐवजी पूर्णपणे दगडांचे बांधकाम असलेल्या या इमारतीला कॉलम नाहीत. एकूण तीन मजले आहेत. सर्वात वरच्या मजल्याच्या स्लॅबला क्रॅक गेल्याने पावसाचे पाणी खोल्यांमध्ये टपकते. तसेच खिडक्यांवर असलेले माळेदेखील केव्हाही कोसळू शकतील, अशा अवस्थेत आहेत.

२००८ मध्ये झाले होते येथील ऑडिट
२००८मध्ये या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. ही इमारत नियमित दुरुस्ती केल्यास वापरता येईल, असे त्या ऑडिट रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर ठरावीक दुरुस्त्याही झाल्या. मात्र, वॉटर प्रूफिंग, रिप्लास्टर, ड्रेनेजलाइनची कामे अजूनही झाली नाहीत.
थेट सवाल
आर. डी. काळे,
कार्यकारी अभियंता, स्थावर विभाग, विद्यापीठ

ह्युमॅनिटीज बिल्डिंग वापरण्यास योग्य आहे का?
होय,नियमित दुरुस्ती करून ती वापरता येईल, असे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यामुळे ही इमारत वापरण्यात सध्या तरी कुठलीही अडचण नाही.
मगत्यावर नियमित दुरुस्ती का होऊ शकली नाही?
एकदादुरुस्ती करण्यात आली होती. आता नव्याने पुन्हा राष्ट्रीय उच्चतम शिक्षा अभियानमधून या इमारतीची दुरुस्ती केली जाणार आहे.
टॉयलेट,पिण्याचे पाणी अशा समस्याही कायम असतात...
बातम्या आणखी आहेत...