आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hunger Strike In Department Of Social Welfare Hostel

उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना बळजबरीने घाटीत हलवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन बुधवारी पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केला. बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास प्रकृती खालावलेल्या तीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी बळजबरीने उचलून घाटीत हलवले. या वेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त जलील शेख उपस्थित होते.
खोकडपुरा येथील समाजकल्याण कार्यालयासमोर विद्यार्थी तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. फक्त चार विद्यार्थ्यांना उपोषणाची परवानगी मिळाली होती. त्याप्रमाणे मारुती राऊत, गणेश अंबिलढगे, भारत डोईफोडे, अर्जुन टिंडे हे चार विद्यार्थी उपोषणाला बसले. मात्र, तिस-या दिवशी सकाळी भारतची प्रकृती खालावली म्हणून त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारुती, अर्जुन आणि गणेश यांचे उपोषण सुरूच होते.
सातशेविद्यार्थी जमले : बुधवारीदुपारनंतर सुमारे सातशे विद्यार्थी घटनास्थळी जमले होते. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाशिवाय हे आंदोलन सुरू होते. आंदोलन केल्यानंतर प्रवेश रद्द होतील, अशी तंबी प्रशासनाने देऊनही आंदोलन सुरूच राहिल्यामुळे प्रशासनाने धसका घेतला. संध्याकाळी पोलिसांच्या मदतीने तीन विद्यार्थ्यांना पोलिसी खाक्या दाखवत समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बळजबरीने घाटीत दाखल केले, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेत नेता सराईत गुन्हेगारासारखे पोलिस व्हॅनमध्ये बसवून नेले. सहायक पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना उचलले.
काय आहेत मागण्या :
निर्वाहभत्ता वेळेवर द्या, अंघोळीसाठी गरम पाणी द्या, पदविका पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टेशनरी द्या, या मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले होते. सहायक आयुक्त जी. एम. शेख आणि समाजकल्याण आयुक्त जितेंद्र वळवी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी तोंडी, तर शेख यांनी लेखी आश्वासने दिली. मात्र, ठोस निर्णय घेतला नाही.
महापुरुषांच्याप्रतिमा उचलल्या :
उपोषणस्थळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या. याबाबत पोलिसांना विचारले असता गर्दीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊन महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून या प्रतिमा आदरपूर्वक ताब्यात घेतल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी हे आंदोलन आणि उपोषण करून प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रकार सुरू केला आहे. आम्ही उपोषणकर्त्यांना उपचारासाठी नेण्याचे पत्र पोलिसांना दिले होते. त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार होत आहे. जलीलशेख, समाजकल्याणसहायक आयुक्त तीन दिवस उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची तब्येत खराब झाली, असे डॉक्टरांकडून आम्हाला कळले. या विद्यार्थ्यांची प्रकृती अजून खालावू नये याकरिता घाटीत नेण्यात आले. मनोहरआव्हाड, सहायकपोलिस निरीक्षक शासकीय वसतिगृहातील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बळजबरीने घाटीत हलवले.