आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवणावरून वाद झाल्याने तिने केली होती आत्महत्या, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस.बी.पवार यांनी दिले. शेख फैसल शेख खलील (२७, रा. राहुलनगर) असे आरोपीचे तर फरहीन शेख फैसल (२३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. 
 
अलीखान रशीदखान पठाण (५६, रा. हमालवाडा रेल्वेस्थानक) यांनी सातारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली होती. पठाण यांची मुलगी फरहीन हिचा डिसेंबर २०१६ मध्ये शेख फैसलसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्यांनी शारीरिक मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. २६ ऑगस्टला फरहीनने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

फिर्यादी कंपनीतून घरी निघालेला असताना सासरच्यांनी फोन करून फरहीनला घाटीत दाखल केल्याचे सांगितले. जेवणाच्या कारणावरून सासू सासऱ्यांसोबत वाद झाल्याने फरहीनने आत्महत्या केल्याचे सांगितले. आरोपीस बुधवारी (२७ सप्टेंबर) अटक करून न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील बी.एन. कदम यांनी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. 
बातम्या आणखी आहेत...