आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याचा बनाव रचून पत्नीचा निर्घृण खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - दरोड्याचा बनाव करत पत्नीचा खून केल्याचा प्रकार वैजापूर तालुक्यातील सुराळा गावात शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी अन्वर मोहंमद मन्सुरी (35) याला अटक करण्यात आली.


अन्वरने पत्नी मुमताज यांच्यात वारंवार वाद होत. मुमताजने अन्वर विरोधात हुंडाबळीचा दावा दाखल केला होता. मात्र, यात तडजोड होऊन मुमताज पुन्हा नांदण्यासाठी सुराळा गावी आली होती; परंतु या दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद सुरूच होते. शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्याने पत्नीच्या डोक्यावर कात्रीने वार करून तिला ठार मारले. त्यानंतर त्याने वैजापूर पोलिस ठाण्यात फोन करून वस्तीवर दरोडा पडला असून, दरोडेखोरांनी माझ्या पत्नीस ठार मारले असल्याचे सांगितले.


त्यावर वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जयराम तावडे यांना प्रथमदर्शनी दरोडा पडल्याचे भासले. त्यानंतर दरोडा प्रतिबंधक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते; परंतु या वेळी अन्वरने पथकाला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच खून केला असल्याचे सांगितले.