आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई अन् बहिणीसाठी पत्नीला सोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घरात आई बहीण मनोरुग्ण. त्यांचा सांभाळ करण्यास बायकोने नकार दिल्याने तिला सोडून आई बहिणीला घेऊन पैठण येथील एक तरुण शहरात आला. मोलमजुरी करून तो दोघींचा सांभाळ करत असल्याचे गुरुवारी रात्री पालिकेच्या पथकाला आढळून आले.

पालिकेने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत बेघरांना घरे देण्यासाठी तीन पथकांमार्फत विशेष शोधमोहीम राबवली. यात १४८ पुरुष-महिला दोन ते दहा वर्षे वयोगटातील २१ बालके आढळून आली. अनेकांना घरच्यांनी नाकारले होते, तर मुलांनी हीन वागणूक देऊन बाहेरचा रस्ता दाखवल्याने काही वृद्ध भीक मागून जगत असल्याचे त्यांनी पथकाला सांगितले. रात्रीला पुलाखाली, धर्मशाळा वा रस्त्याच्या कडेला आसरा मिळेल तिथे अंग टाकतात. या बेघरांची अवस्था पाहून आणि आपबीती ऐकून सर्वेक्षण करणारे अधिकारी हेलावून गेले.
रात्रीबाराला आयुक्तांची भेट : सर्वेक्षणपथकाला रात्री १२ ला मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया शनिमंदिराजवळ भेटले. येथे आढळलेल्या बेवारसांची चौकशी केली. तसेच उपायुक्त अय्युब खान यांनीही साडेअकरा ते बारा वाजेपर्यंत रेल्वेस्टेशन परिसरात पथकासोबत सर्वेक्षण केले.

५०स्क्वे. फूट जागा मिळणार : राष्ट्रीयनागरी उपजीविका अभियानांतर्गत प्रत्येक बेघर व्यक्तीला किमान ५० चौरस फुटांची जागा दिली जाणार आहे.

काहींनी दिली खोटी माहिती
झोपेतूनउठवून माहिती अर्ज भरून घेण्यासह फोटो काढण्याचे काम मनपाच्या पथकाकडून करण्यात येत असल्याने अनेक जण गांगरून गेले. बसस्थानक परिसरातील अनेकांनी भयभीत होऊन पळ काढला. अचानक सुरू केलेल्या या मोहिमेमुळे अनेकांनी आम्ही आताच आलो, सकाळी जाणार, अशी खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला.
बातम्या आणखी आहेत...