आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून, पोलिसांनी ताब्‍यात घेतले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-  गारखेडा परिसरातील विशालनगरमध्ये संशयावरून एकाने गळा दाबून पत्नीचा खून केला. महिलेच्या नातेवाइकांना मृत्यू संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. तपासणीत श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आला. पोलिसांनी तत्काळ पतीला ताब्यात घेतले. तेव्हा मी तिला मारले नाही, तिनेच आत्महत्या केल्याचे तो ओरडून सांगत होता. मंगल सचिन वायचाळ (३०) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती सचिन सीताराम वायचाळ (३५, रा. विशालनगर, गारखेडा) याच्यावर रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. 

 

मंगल या मोलकरीण म्हणून काम करत होत्या. त्यांचा पती एका मसाल्याच्या कंपनीत काम करतो. २००८ मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांना दोन मुले आहेत. रविवारी सकाळी मंगल बेशुद्ध पडल्याची माहिती सचिनने तिच्या माहेरच्यांना दिली. तिला घाटीत दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. अनेकदा तो दारू पिऊन मारहाण करत होता, असा आरोप नातेवाइकांनी केला. त्यामुळे मंगलचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय आल्याने त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांना माहिती दिली. उपनिरीक्षक शिंदे, सहायक फौजदार बोटके यांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी पंचनामा केला. तेव्हा मंगलचा मृत्यू श्वास गुदमरून झाला असून तिच्या गळ्यावर ओठांवर मारहाणीचे व्रण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतले. 

बातम्या आणखी आहेत...