आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचा खून करणा-या पत्नीला पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - अनैतिक संबंधात अडसर ठरणारा पती युवराज ढगे यांचा सुपारी देऊन खून करणारी पत्नी श्वेता, तिचा प्रियकर योगेश आणि सुपारी किलर रवी गाडेकरला न्यायालयाने 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर श्वेताच्या अल्पवयीन बहिणीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

येथील ए. एस. क्लबच्या पाठीमागील भागात युवराज बाबूराव ढगे (32, रा. असरवाडा, ता. निलंगा) हे पत्नी व दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहत होते. युवराज यांचा क्रेनचा व्यवसाय होता. त्यांनी योगेश नंदू सांगळे याला सुपरवायझर म्हणून कामावर ठेवले होते. कामामुळे योगेशचे अनेक वेळा घरी येणे-जाणे होते. यातून युवराजची पत्नी श्वेता व योगेश यांचे अनैतिक संबंध जुळले. याची कुणकुण लागल्यामुळे युवराज यांनी योगेशला कामावरून काढले होते. त्यानंतरही योगेशचे घरी येणे-जाणे सुरूच राहिल्याने युवराज व श्वेतामध्ये वाद होत होते. त्यामुळे युवराजचा काटा काढण्यासाठी योगेश व श्वेताने रवी गाडेकरला 40 हजार रुपयांत सुपारी देऊन सोमवारी मध्यरात्री त्यांचा खून केला होता.
युवराजचा मृतदेह श्वेताने अल्पवयीन बहीण व योगेशच्या मदतीने फुलंब्री तालुक्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पुढे श्वेतालाच पश्चात्ताप होऊन तिने ही सर्व घटना पोलिसांना सांगून गुन्ह्याची कबुली दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी श्वेता, तिचा प्रियकर योगेश आणि खुनी रवी गाडेकरसह अल्पवयीन मेहुणी अशा चार जणांना अटक केली होती. या सर्वांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रुती शर्मा यांनी त्यांची 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे, तर श्वेताच्या बहिणीची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. सरकार पक्षातर्फे डी.आर.काठुळे यांनी, तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सुरेश तांदुळजे यांनी काम पाहिले.

युवराजच्या मृतदेहाची होणार डीएनए चाचणी
युवराजचा मृतदेह जवळपास ऐंशी टक्के जळाला आहे. मात्र, तो युवराजचाच क ी आणखी कुणाचा, हे सिद्ध होण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मृत युवराजचे वडील बाबासाहेब ढगे यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिली.