आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चारित्र्यावर संशय घेत रेल्वेस्टेशन राजीवनगर भागातील महिलेचा तिच्या पतीने गळा आवळून खून केला. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. ज्योती रामदास साळवे (२५) असे या महिलेचे नाव आहे. तिचा पती दीड वर्षाच्या मुलासह फरार झाला आहे.

ज्योती पती दीड वर्षाच्या मुलासह राजीवनगरात राहत होती. रामदास मजुरी करतो. तर ज्योतीही मजुरी करायची. तो नेहमी ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमधे खटके उडायचे. दोघांत भांडण झाल्याने ती अबरार कॉलनी येथे माहेरी गेली होती. रामदास शनिवारी तिला घेण्यासाठी गेला आिण गोड बोलून तिला राजीवनगरातील घरी घेऊन आला. त्यानंतर दोघांत आणखी भांडण झाले आणि सायंकाळच्या सुमारास रामदासने गळा आवळून तिचा खून केला. मुलगी परत आल्याने ज्योतीच्या आई-वडिलांनी सगळीकडे शोधाशोध केली. विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून रामदासही शनिवारी त्यांच्यासोबत फिरला. नंतर मात्र तो मुलाला घेऊन फरार झाला. राजीवनगरातील घरी पाहिल्यानंतर ज्योतीचा मृतदेह घरात पडलेला दिसला. क्रांती चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.