आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसने दिलेले पैसे परत मागितल्‍याने पतिनेच केली पत्‍नीची हत्‍या, जबरदस्तीने पाजले विष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिऊर- माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या दोन घटनांनी शिऊर परिसर दोन दिवसांपूर्वी हादरला. पोखरी येथे आई व वडिलांनीच आपल्या पुत्राचा बळी घेतला तर दुसऱ्या घटनेत अलापूरवाडी येथे उसने दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणाहून पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना घडली. दरम्यान दोन्ही घटनांतील आरोपीविरोधात शिऊर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. 

वैजापुर तालूक्यातील अलापूरवाडी येथील विवाहितेस पतीनेच विषारी औषध देऊन ठार केल्याची घटना दि. ६ रोजी घडली. जरीना हरुण शेख (२९) असे घटनेत मृत्यमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. जारीना यांच्या वडिलाकडून जावई हारून शेख यांनी उसने पैसे घेतले होते. सासऱ्याने पत्नी मार्फत दिलेल्या पैशांचा तगादा लावल्याने जावई हरवून शेख संतप्त होता. माझ्या वडिलांचे उसने घेतलेले पैसे देऊन टाका असे जारीना हिने पतीला सांगितल्याने रागाच्या भरात हारुण शेख यांच्यासह चार जणांनी जरीना हिला मारहाण करून जबरदस्तीने विष  पाजून ठार केले. जारीनाचे वडील कौसरद्दीन महम्मद पटेल (रा. जवळकी, ता. नांदगाव, जि.नाशिक) यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती हारुण बशीर शेख, दीर सलीम बशीर शेख, मलिका बशीर शेख, नासिफा बशीर शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
बातम्या आणखी आहेत...