आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहामध्ये केस निघाला म्हणून पत्नीचा खून, न्यायालयाने आरोपीला ठाेठावली जन्मठेपेची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चहामध्ये केस निघाल्याने पत्नीचा खून करणाऱ्या शिवाजी माणिकराव निर्मळ यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी माहिती अशी, १६ मार्च २००३ मध्ये आरोपी शिवाजी निर्मळ (५०, रा. थेरगाव ता. पैठण) पत्नी इंदूबाईसह जावई कृष्णा काळे यांच्याकडे गेले होते. त्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता शिवाजी याने इंदूबाई यांना चहा देण्याचे सांगितले, त्यानुसार चहा दिला. मात्र, चहामध्ये केस निघाला आणि शिवाजी पत्नीवर भडकला. दोघांमध्ये भांडण झाले. शिवाजीने इंदूबाईच्या डोक्यात वेळूची काठी मारून गंभीर जखमी केले. बेशुद्ध पडल्यानंतर फावड्याने तिच्या डोक्यावर वार केले, ती ठार झाल्याची खात्री पटल्यावर मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतात पुरला. त्यानंतर तो १९ मार्च २००३ रोजी फुलंब्री पोलिसांना शरण जाऊन घडलेला प्रकार सांगितला. तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक पी. एच. अंकुशकर यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील उदय पांडे यांनी याप्रकरणी १३ साक्षीदार तपासले. यापैकी मुलगी, जावई पंचांची साक्ष महत्त्वाची ठरली. दरम्यान पांडे यांनी केलेला युक्तिवाद साक्ष ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेप आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
बातम्या आणखी आहेत...