आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन -पतीच्या छळाला कंटाळून शिरेगाव येथील एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान घडली. शकुंतला किशोर गायकवाड (३२,रा. शिरेगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तुला स्वयंपाक करता येत नाही, त्यामुळे पती शकुंतलाचा शारीरिक छळ करत होता. त्यामुळे तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, असे विवाहितेचा भाऊ संजय दाभाडे यांनी गुरुवारी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करत किशोरला पोलिसांनी अटक केली.
बातम्या आणखी आहेत...