आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळीत पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच पतीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रागाच्या भरात जाळून घेतलेल्या महिलेचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही वार्ता तिच्या पतीला कळताच त्याने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. जखमी पतीवर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भोईवाडा परिसरातील उदय कॉलनी येथे राहणारी सीमा दिनेश राजपूत (३५) आणि तिचा पती दिनेश राजपूत यांच्यात धुळ्याजवळील जामनेर येथील काकाच्या संपत्तीवरून नेहमीच खटके उडायचे. दिनेशचे काका निपुत्रिक असल्याने त्यांची जमीन दिनेशने आपल्या नावे करून घेण्याचा तगादा सीमाने लावला होता. याच कारणावरून १६ सप्टेंबर रोजी पती-पत्नीत वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात सीमा हिने जाळून घेतले. गंभीर अवस्थेत दिनेशने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर वॉर्ड क्र. २२-२३ मध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु २३ सप्टेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

बायकोमृत झाल्याचे कळताच त्याने मारली उडी : सीमाचामृत्यू झाल्याचे दिनेशला कळाल्यानंतर तो वॉर्डात गेला. त्याने सीमाच्या पार्थिवाकडे पाहिले आणि दुसऱ्या मजल्यावर असलेल्या याच वॉर्डाच्या खिडकीतून त्याने खाली उडी मारली. यात त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. पाठीला डोक्याला मारही लागला. गंभीर अवस्थेत त्याला नातलगांनी पुढील उपचारासाठी धुळ्याला नेले, अशी माहिती क्रांती चौक ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नीता मिसाळ यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी सीमाच्या भावाने क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीत दिनेशचे दोन भाऊ आणि दोन नणंदा सीमाला विरोध करीत होत्या, असे म्हटले आहे.

आठ दिवसांतील दुसरी घटना
वेदनासहन होत नसल्याने १३ सप्टेंबरला गौतम दशरथ शिवराळे (५०, रा. पळसवाडी) या रुग्णाने घाटी रुग्णालयातील दुसऱ्या मजल्याच्या खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आज याच वॉर्डाच्या खिडकीतून सीमाचा पती दिनेशने उडी मारली.
बातम्या आणखी आहेत...