आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा नांदायला नकार; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पत्नी नांदण्यासाठी येत नाही म्हणून क्रांती चौक परिसरातील रमानगरात राहणार्‍या युवकाने गारखेडा, इंदिरानगर भागातील सासर्‍याच्या घरासमोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना 3 डिसेंबरला सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली.
मंगेश रमेश खिल्लारे (27) याची पत्नी काही दिवसांपासून त्याच्यासोबत राहत नव्हती. त्यामुळे मंगेश मद्यधुंद अवस्थेत सासरा अण्णा शिवराम नवगिरे यांच्याकडे गेला. नवगिरे यांनी मुलीला सोबत पाठवण्यास विरोध केला. तेव्हा मंगेशने घरासमोर धुडगूस घातला. नवगिरे यांनी जवाहरनगर पोलिसांशी संपर्क साधला. त्या वेळी मंगेशने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.