आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: पत्नीचा छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कापडणे- पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. ज्ञानेश्वर उर्फ मयूर अशोक बडगुजर (वय २८) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ज्ञानेश्वरने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्याने पत्नीसह सासरे अाजल सासऱ्यांच्या धमकीला कंटाळून अात्महत्या करत असल्याचे म्हटले अाहे. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. 

येथील कॉलनी परिसरात ज्ञानेश्वर उर्फ मयूर बडगुजर हा अाई-वडील लहान भावासोबत राहत होता. त्याचे वडील अशोक बडगुजर काही कामानिमित्त नातेवाइकांकडे राजकोट येथे गेले होते. तसेच अाई लहान भाऊ अमोल शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शेतात कामासाठी गेले. त्यामुळे ज्ञानेश्वर उर्फ मयूर घरी एकटाच होता. या वेळी त्याने छताला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार दुपारी १२ वाजता अमोल अाईला शेतात सोडून घरी आला तेव्हा उघडकीस आला. त्यानंतर अमोलने चुलत भाऊ महेश बडगुजरच्या मदतीने ज्ञानेश्वरला खाली उतरवले. त्यानंतर त्याला तातडीने सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. 

डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. मृत ज्ञानेश्वरने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठी घटनेनंतर आढळून आली. या चिठ्ठीत त्याने पत्नीसह सासरे अाजल सासऱ्यांच्या धमकीला कंटाळून अात्महत्या करत असल्याचे म्हटले अाहे. याप्रकरणी अमोल बडगुजर याने सोनगीर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात अाली अाहे. संबंधितांवर चौकशीअंती गुन्हे दाखल होणार असल्याचे समजते. ज्ञानेश्वरच्या पश्चात अाई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, ज्ञानेश्वरने लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नी धमकी देत होती, असा आरोप पत्नीवर केला आहे. याप्रकरणी तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...