आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : एका तासासाठी एक हजारांत मिळत होती तरुणी, पती -पत्‍नीला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या तरुणींकडे देहविक्री व्‍यवसाय करून घेतला जात होता. - Divya Marathi
या तरुणींकडे देहविक्री व्‍यवसाय करून घेतला जात होता.
औरंगाबाद - शहरातील जटवाडा रस्‍त्‍यावर असलेल्‍या ईडन प्लाझा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्‍ये सुरू असलेल्‍या कुंटखान्‍यावर पोलिसांनी सोमवारी छापा मारला. यात पती - पत्‍नीसह एका दलालास अटक करण्‍यात आली. दरम्‍यान, या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या तीन तरुणींची सुटकाही करण्‍यात आली. ममता कापसे, संजय कापसे आणि दलाल मधुकर पवार अशी आरोपींची नावे आहेत.
अशी केली कारवाई
> ईडन प्लाझा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक तीनमध्‍ये तरुणींकडून वेश्‍याव्‍यवसाय करून घेतला जात असल्‍याची गुप्‍त माहिती पोलिसांना मिळाली होती.
> त्‍या आधारे स्‍थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सोमवारी सायंकाळी छापा मारला.
> यात कापसे दाम्पत्य, दलाल पवार आणि तीन तरुणी आढळल्या.
सापडली कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची
या ठिकाणी पोलिसांना कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची पाकिटेसुद्धा सापडली. या कारवाईत पोलिसांनी रोख नऊ हजार रुपये आणि आठ मोबाईल हॅण्डसेट जप्‍त केले.
एक हजारांत मिळत होती तरुणी
या ठिकाणी ग्राहकाला एक हजार रुपयांत एका तासांसाठी एक तरुणी उपलब्‍ध करून दिली जात होती. यासाठी पवार ग्राहक शोधून आणत होता. त्‍याला कापसे दाम्‍पत्‍याकडून कमिशन दिले जात होते. या हजार रुपयातून ठरावीक रक्‍कम संबंधित तरुणीलाही दिली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पुढील स्‍लाइड्सवर वाचा, हेल्‍थ सेंटरच्‍या नावाखाली सुरू होता देहविक्रय व्‍यवसाय... तिघांनाही 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी आणि पाहा संबंधित फोटोज....​
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)