आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या मंडळीला मत द्या! पत्नीला नगरसेवक करण्यासाठी कार्यकर्ते सरसावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महानगरपालिकेच्या निवडणुकीत ११३ पैकी ५७ वॉर्डांत महिला आरक्षण असल्याने इच्छुक महिलांच्या पतिराजांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. 'अहो, आमच्या मंडळीला मत द्या,' असा आवाज अनेक वॉर्डांतून एेकायला येत आहे. विशेष म्हणजे फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरही बायकोच्या कर्तृत्वाची स्तुतिसुमने उधळली जात आहेत.

अनेक इच्छुकांचे वॉर्ड आरक्षित झाल्यामुळे मला उभे राहता नाही आले म्हणून काय झाले! पण आमची 'होम मिनिस्टर' उभी करतोय. तेव्हा मंडळीला मते द्या, मी कामे पूर्ण करून देतो, असा पवित्रा पतिराजांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी हायटेक तंत्रज्ञानाचाही वापर सुरू केला आहे. ज्योतीनगर, हडकोतील यादवनगर, मयूर पार्क, शिवनेरी कॉलनी, एन-६ सिडको या ठिकाणी असे प्रकार पाहायला मिळत आहेत.

मंडळीला मत द्या
‘घरात सुगरण, कामात नंबर वन, वॉर्ड विकासातही होईल नंबर वन. फक्त एकच करा, आमच्या मंडळीला मत द्या,’ असा एसएमएस व्हॉट्सअॅपवर फिरत आहे.
तीन जणांनी भरले उमेदवारी अर्ज
मनपा निवडणुकीसाठी आज तीन जणांनी उमेदवारी अर्ज भरले. दुसरीकडे अर्ज विकत घेणा-या इच्छुकांची संख्या सलग तिस-या दिवशीही वाढतच असून आज दिवसभरात ३७७ जणांनी ७२७ अर्ज विकत घेतले. आज तिस-या दिवशी दहाही केंद्रांवर मिळून ३७७ जणांनी ७२७ उमेदवारी अर्ज नेले. गेले दोन दिवस एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. आज गरवारे स्टेडियमवरील केंद्रात दोन तर वाॅर्ड ड कार्यालयात १ असे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले.