आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुसेन खूनप्रकरणी एकास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मोहंमद हुसेन खान ऊर्फ आसिफ युसूफ खान (30) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (9 एप्रिल) फजल पटेलचा साथीदार शेख मोबीन शेख करीम (30) याला टाऊन हॉल परिसरातून अटक केली. न्यायालयाने त्याला 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबीन फरार झाल्यापासून पोलिस त्याच्या मागावर होते. तो शहराबाहेर पळाला असावा, असाही पोलिसांचा कयास होता. मात्र, खबर्‍यांनी मोबीन औरंगबादेतच असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी टाऊन हॉल भागात लक्ष केंद्रीत केले आणि पहाटेच्या सुमारास त्याला जेरबंद केले. हसरूल परिसरात रविवारी (7 मार्च) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास फजल सिकंदर पटेलने (35) मोहंमद हुसेनचा दगडाने ठेचून खून केला होता. फजल मात्र अद्याप पोलिसांना सापडू शकला नाही. पैशाच्या देवाण-घेवाणीवरून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हुसेन हा मौलाना आझाद महाविद्यालयासमोर चहाचे हॉटेल चालवत होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी फजलला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील तेलुरे यांनी सांगितले.