आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय उदासीनतेमुळे पडले हुतात्मा स्मारक अडगळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाचे बलिदान देणार्‍या हुतात्म्यांच्या स्मृती पुढील पिढीला आदर्श ठराव्यात या उद्देशाने वाळूज भागात हुतात्मा स्मारक बांधले गेले. मात्र नव्याचे नऊ दिवस संपताच त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हे स्मारक सध्या अडगळीत पडले आहे. सर्व बाजूने अतिक्रमणांचा वेढा पडला आहे. राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे हुतात्मा स्मारकाची दुरवस्था झाली आहे. त्याला ग्रामपंचायत प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 सप्टेंबर 1948 दरम्यान केलेल्या लष्करी कारवाईनंतर 17 सप्टेंबरला मराठवाडा निझामाच्या जुलमी जोखडातून मुक्त झाला. मात्र मराठवाड्याला निझामाकडून मुक्ती मिळावी म्हणून अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राण पणाला लावले. वाळूज भागातून जवळपास 36 स्वातंत्र्यसेनानींनी मराठवाडा मुक्ति संग्रामात सहभाग नोंदविला होता. त्यातील अनेक शहीद झाले होते. त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात, पुढील पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा, या उद्देशाने एक हजार स्क्वेअर फूट जागेवर नगर-औरंगाबाद महामार्गावर हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत स्मारकाच्या चोहोबाजूने पक्की अतिक्रमणे झाली आहेत.

स्मारकाला अतिक्रमणांचा विळखा : वाळूज भागातील 36 स्वातंत्र्यसेनानींनी मराठवाडा मुक्ति संग्रामात प्रत्यक्षात सहभाग नोंदवला. त्यांची नावे असलेला फलक लावून येथील समाज मंदिरासमोर हुतात्मा स्मारक उभारले गेले.

प्रारंभीच्या काळात प्रशासनाकडून त्याची देखभाल होत असल्याने स्मारक सुस्थितीत होते. आता मात्र, त्याची दुरवस्था झाली आहे. चोहोबाजूने पक्की अतिक्रमणे झाल्यामुळे स्मारकाच्या एक हजार स्क्वेअर फूट जागेपैक ी केवळ दहा फूट लांबी व पाच फूट रुंदीच्या जागेत स्मारक तग धरून उभे आहे. मात्र दिवे नसल्यामुळे रात्रीच्यावेळी स्मारक क ाळोखात हरवून जाते. अनेकवेळा मागणी करूनही तेथे पथदिवे बसविण्याचे औदार्य ग्रामपंचायतीकडून दाखविले जात नाही.