आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हैदराबाद स्फाेटाचा सूत्रधार, औरंगाबादचा अतिरेकी अब्दुल नईम लखनऊतून जेरबंद; लष्‍कर ए तोयबाचा हस्‍तक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/औरंगाबाद- औरंगाबादचा मूळ रहिवासी आणि लष्कर-ए-तोयबाचा फरार अतिरेकी अब्दुल नईम शेख याला राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनआयए) मंगळवारी लखनऊत हॉटेलमधून अटक केली. काश्मिरातील लष्करी छावण्या व विद्युत प्रकल्पांची रेकी करताना एनआयएने अब्दुलच्या मुसक्या अावळल्या. त्याच्याकडून या जागांचे फोटो व व्हिडिओ जप्त करण्यात आले अाहेत. 


२००६ हैदराबाद बाॅम्बस्फोटाचा मुख्य आरोपी अब्दुलला २०१४ मध्ये अटक झाली होती. पेशीसाठी मुंबईहून कोलकाता येथे नेताना हावडा एक्स्प्रेसमधून उडी मारून तो फरार झाला होता. पुढील चौकशीसाठी हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले आहे. मुंबईतील रेल्वे बाॅम्बस्फाेटातही त्याचा सहभाग असल्याचा संशय अाहे.


भारतातील तरुण पाकमध्ये पाठवायचा

अबू जुंदालच्या माध्यमातून अब्दुल तोयबाच्या संपर्कात आला. तो काही काळ बांगलादेशात राहत होता. नंतर कोलकात्यात वास्तव्यास आला. त्या वेळी तो ट्रान्सपोर्टर म्हणून काम करायचा. तो भारतातील तरुण बांगलादेशमार्गे  पाकिस्तानात पाठवत असे. तेथील प्रशिक्षित तरुण तो याच मार्गे भारतात आणत असे. या काळात अबू जुंदालच्या संपर्कात शहरातील अनेक तरुण आले होते. जंुदालला महाराष्ट्र एटीएसने २६/११ प्रकरणी काही वर्षांपूर्वी अटक केली असून तो सध्या मुंबईतील जेलमध्ये आहे.


मोठ्या हल्ल्याचा होता कट

अब्दुल हा मोठ्या हल्ल्याचा कट रचत असल्याचा संशय आहे. फरार झाल्यानंतर अनेक गुप्तचर संस्था अब्दुलच्या मागावर होत्या. दोन दिवसांपूर्वी तो लखनऊच्या हॉटेलमध्ये लपल्याची माहिती एनआयएला मिळाली. यानंतर एनआयएच्या दिल्ली आणि यूपीच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई करून त्याला मंगळवारी पकडले.

 

बीडचा अतिरेकी अबू जुंदालचा होता साथीदार, हेडलीप्रमाणे रेकीचे काम 
सुरक्षा संस्थांनी दावा केला आहे की, लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडलीप्रमाणेच अब्दुल नईमवरही महत्त्वपूर्ण जागांची रेकी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. विशेष म्हणजे तो वेरूळ शस्त्र तस्करी प्रकरण आणि मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा आरोपी बीडचा लष्कर-ए- तोयबाचा अतिरेकी अबू जुंदाल ऊर्फ जबिउद्दीन अन्सारीचाही साथीदार आहे.

 

रेल्वेतून उडी मारून फरार
हैदराबाद स्फाेटानंतर त्याला बीएसएफने २००६ मध्ये अटक केल्याचे सांगितले जाते. तेव्हा त्याच्याकडून ४३ किलो आरडीएक्स व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. यानंतर २०१४ मध्ये मुंबई पोलिस त्याला पेशीसाठी कोलकाता येथे नेत होते. छत्तीसगडमधील रायगड शहराजवळ रेल्वेतून उडी मारून तो फरार झाला होता. 

 

लष्करी छावण्यांची रेकी   
अब्दुलने नुकतीच काश्मीरमध्ये लष्करी छावण्या, विद्युत प्रकल्पांसह इतर संवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती.  त्याने हिमाचल प्रदेशातीलही काही ठिकाणे विशेषत: इस्रायली नागरिकांची नेहमी गर्दी असलेल्या कसोललाही भेट दिली होती.  त्याच्याकडून या जागांचे फोटो आणि व्हिडिओही जप्त केले आहेत.

 

पळाल्यानंतर स्थापला स्लीपर सेल

रेल्वेतून फरार झाल्यानंतर अब्दुलने ताेयबाचा हस्तक अमजदच्या अादेशानुसार नवीन स्लीपर सेल उभारला. यानंतर त्याने काश्मीर, हिमाचल आणि यूपीत अनेकदा रेकी केली. ताजमहालासह अनेक पर्यटनस्थळे हे त्याचे लक्ष्य होते.

बातम्या आणखी आहेत...