आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hyderabad Freedom Struggle News In Marathi, Ganpatrao Shinde, Divya Marathi

मुक्तिसंग्रामात गंगापूरच्या शिंदे यांचे योगदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - निझामाच्या तावडीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली जो लढा उभारला गेला, त्यात गंगापूरचे लक्ष्मणराव गणपतराव शिंदे यांचा समावेश आहे. वयाच्या ९५ व्या वर्षात आपल्या काप-या आवाजात त्यांनी सांगितलेले वर्णन ऐकून अंगावर शहारे येतात.

देश १९४७ ला स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबादच्या निझामाने भारतात वलिीन होण्यास नकार दलिा. त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात तरुणांनी तीव्र आंदोलन उभे करून निझामाला हैराण करून सोडले होते. गंगापूर तालुक्यातील दहा ते बारा स्वातंत्र्यसैनिकांनी दोनशे ते अडीचशे आदिवासी भलि्ल तरुणांच्या मदतीने प्रवर संगम, जैनपूर, टाकळी कायगाव, नेवरगाव, नागमठाण व परिसरातील ७२ नाके ३ दिवसांमध्ये जाळून राख केले होते.
या कृतीची शिक्षा निझाम पोलिसांनी लक्ष्मणराव शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना दोन महिने तुरुंगवासात ठेवून कायमस्वरूपी तुरुंगात डांबण्याचा निर्णय घेतला होता. लक्ष्मणराव शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिस घेऊन जात असताना निझामाच्या तीन पोलिसांवर हल्ला करून स्वत:ची सुटका करून घेऊन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनमाडकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये प्रवेश मिळवला व निझामाच्या पोलिसांना चुकवण्यासाठी निझामाच्या काळातील शेवटचे रेल्वेस्टेशन असलेल्या अंकाईपर्यंत रेल्वेच्या स्वच्छतागृहात लपून प्रवास केला. त्यानंतर मनमाड येथे माणिकचंद पहाडे यांनी स्वातंत्र्यसैनिकांसाठी उभारलेल्या शिबिरात आश्रय घेतला. लक्ष्मणराव शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना जिवंत व मृत पकडून देणाऱ्यास निझाम सरकारने दोन हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. गंगापूरचे इतर स्वातंत्र्यसैनिक आसारामजी कुमावत, भाऊराव पाटील धोत्रे (काटेपिंपळगाव), वामनराव नाळके, रामगोपाल नावंदर, लक्ष्मणराव पाटील, जयनारायण नावंदर, रामप्रसाद नावंदर यांच्यासह इतर अनेक साथीदार होते. वार्धक्यामुळे सर्वांचे नावे आठवत नसल्याचे लक्ष्मणराव शिंदे यांनी सांगितले. यापैकी रामप्रसाद नावंदर हे हयात असल्याचे त्यांनी सांगितले.