आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद-अजमेर एक्स्प्रेस धावणार शनिवारपासून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद । हैदराबाद-अजमेर ही नवी एक्स्प्रेस रेल्वे येत्या शनिवारपासून (14 जुलै) दर आठवड्याला धावणार आहे. ही एक्स्प्रेस रेल्वे (क्रमांक 17020)दर शनिवारी दुपारी 3 वाजता हैदराबादहून निघून मध्यरात्री 1.20 वाजता औरंगाबादला पोचेल. 1.22 वाजता येथून रवाना होऊन सोमवारी पहाटे 3 वाजता अजमेरला पोहोचणार आहे.
ही रेल्वेगाडी सिकंदराबाद, निझामाबाद, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चित्ताैडगड, भिलवाडा मार्गे अजमेरला जाणार आहे. या रेल्वेसेवेला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून या तिकीट आरक्षणास अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही एक्स्प्रेस रेल्वे राज्यमंत्री के.एच. मुनियप्पा यांच्या उपस्थितीत 6 जुलैपासून सुरू होणार होती. परंतु मंत्र्यांना वेळ न मिळाल्याने उद्घाटन रद्द करण्यात आल्याने एक्स्प्रेसला एक आठवड्याचा उशीर झाला आहे. याशिवाय कोटाऐवजी आता रतलाम मार्गे ही रेल्वे धावणार असल्याने 22 तासांत अजमेरला पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे 6 तास वाचणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.