आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ह्युंदाईचा प्रकल्प शहरात आणू : मुख्यमंत्री, डिफेन्स क्लस्टर देण्याचे आश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; जगप्रसिद्धह्युंदाई कारचा उत्पादन प्रकल्प आणण्यासाठी विशेष प्रयत्न करू, असे आश्वासन औरंगाबादेतील उद्योजकाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ह्युंदाईसह औरंगाबादला संरक्षण विभागासाठी लागणारी यंत्रसामग्री उत्पादनासाठी डिफेन्स क्लस्टर देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांसह औरंगाबादचे १२ उद्योगपती जपानमधील ओसाका येथे सकाळी ११ वाजता पोहोचले. मराठवाड्यातील उद्योजकांशी त्यांनी पाऊण तास विशेष संवाद साधला. मराठवाड्यातून गेलेल्या उद्योजकांची मुख्यमंत्र्यांनी जातीने चौकशी करून प्रत्येकाशी हस्तांदोलन केले.

महाराष्ट्रात या, तुमचे स्वागत आहे
सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कंसाई शहरातील हॉटेल न्यू ओतिनोमध्ये ‘मेक इन महाराष्ट्र तेथील उद्योगांच्या संधी’ या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानी उद्योजकांना मार्गदर्शन केले. या वेळी साडेतीनशेवर जपानी उद्योजक उपस्थित होते. यातील दोनशेवर उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीची तयारी दाखवली. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात तुमचे स्वागत आहे, असे निमंत्रणच जपानी उद्योजकांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.