आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • I Am Impressed By Senior Citizens Engergy MLA Sanjay Shirsath

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमचा उत्साह पाहून मी रिचार्ज झालो - आमदार संजय शिरसाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ज्येष्ठांची काळजी घेणे, सांभाळ करणे हे तुम्हीच आमच्यावर केलेले संस्कार आहेत. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील तुमचा उत्साह पाहून मी रिचार्ज झालो, अशा शब्दांत आमदार संजय शिरसाट यांनी सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्येष्ठांना सलाम केला. तुम्ही आजवरच्या आयुष्यात इतरांसाठी खूप काही केले आहे, आता स्वत:च्या आनंदासाठी जगा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

"सदाचार'च्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी महापौर विकास जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विवाहाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या म. श. कुलकर्णी आणि संतुकराव जोशी या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला, तर प्रा. व्यंकटेश जोशी, उषा देशपांडे यांचा स्वयंसेवी सभासद म्हणून सत्कार करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरणही या वेळी करण्यात आले. प्रा. जगन्नाथ कोपरकर, चंद्रकांत पारवेकर यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत केले. अशोक भालगावकर यांनी सूत्रसंचालन केले. भगवान देशपांडे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी, रमेश आंबेकर यांनी परिश्रम घेतले.