आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Strong Candidate For Party Region Chairman : Mp Raosaheb Danwe

प्रदेशाध्यक्षपदाचा मीच प्रबळ दावेदार - खासदार रावसाहेब दानवे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आपणच प्रबळ दावेदार असल्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपमध्ये मुंडे अथवा गडकरी गट नसून सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. सध्या विनोद तावडे, एकनाथ खडसे यांनी प्रदेशाध्यक्षपद घेण्यास नकार दिल्याने आपल्याला पद मिळाल्यास ग्रामीण भागाचा सन्मान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच याबाबत पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असेल, असे दानवे म्हणाले.

औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदाच्या तिढ्याबाबत दानवे म्हणाले, एकमत होत नसल्याने आम्ही हा निर्णय प्रदेश कार्यकारिणीवर सोपवला आहे. येत्या आठवड्यात जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय होईल. सिल्लोड व फुलंब्री तालुकाध्यक्षपदाची निवड लांबली नसून दोन दिवसांत ती होईल.