आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तर हृदयदानासाठी मी मरते, तरुणीचा डॉक्टरांना फोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उपचार करून डॉक्टरांनी रुग्णांचे प्राण वाचवल्याच्या अनेक घटना आहेत, परंतु डॉक्टरांच्या समयसुचकतेमुळे आणि पोलिसांच्या सक्रियतेमुळे शहरातील एका तरुणीचे प्राण वाचल्याची घटना सोमवारी रात्री घडली. मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणीने आत्महत्येचा विचार केला होता, परंतु पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर तिने विचार बदलला. तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.

सोमवारी रात्री शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञांना एका तरुणीचा फोन आला. "मला माझे हृदय दान करायचे आहे, त्यासाठी काय करू' असा प्रश्न तिने विचारला. डॉक्टरांनी तिला मृत व्यक्तीचेच हृदयदान करता येत असल्याचे उत्तर दिले. त्यावर ती मी जीव देते त्यानंतर तरी हृदय घ्या, असे ती म्हणाली. त्यांनी पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. मोबाइल नंबर नंदुरबार येथील व्यक्तीच्या नावावर असल्याचे कळले. शहरात आत्महत्या करता येण्यासारख्या सर्व ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली. माेबाइल ट्रेस केल्यावर ती तरुणी हडको भागात वास्तव्यास असल्याचे कळले. पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, नितीन आंधळे, अविनाश थिटे यांनी तिची भेट घेत समजूत काढली.
बातम्या आणखी आहेत...