आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे- उस्मानाबाद विद्यापीठास माझा विरोध पण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबादेत स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या प्रस्तावावर आपण स्वाक्षरी करू, पण व्यक्तिश: मी या प्रस्तावाच्या विरोधात आहे, अशी द्विधा मन:स्थिती दर्शवणारे विधान कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले आहे. मंगळवारी (२६ मे) पत्रकार परिषदेत व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी कुलगुरूं समक्ष स्वतंत्र विद्यापीठाची भूमिका मांडल्यानंतर त्यांनी सावध पवित्रा घेत अपरिहार्यता नमूद केली.
व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेत संजय निंबाळकर यांनी ठराव मांडून स्वतंत्र विद्यापीठाची मागणी केली आहे. त्यासाठी डॉ. अशोक मोहेकर यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे. उस्मानाबादच्या ६८ महाविद्यालयांसाठी ६० एकर परिसरामध्ये उपकेंद्राची इमारत तयार आहे. राज्य शासनाला अधिक खर्च करण्याची गरज नसल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात कुलगुरूंच्या स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यासंदर्भात विनाकारण वाद उपस्थित करण्यात काहीच अर्थ नाही. हवे असल्यास उस्मानाबाद विद्यापीठाला माता रमाईंचे नाव देण्यास काहीच हरकत नसल्याचेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले. कुलगुरूंची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी व्यक्तिश: आपला विरोध असून मला आता सही करणे गरजेचे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्ताव पाठवू, मात्र राज्य सरकारचा निर्णय अंतिम राहील.
२९ मे रोजी व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात डॉ. मोहेकर समितीची बैठक होत असून त्या वेळी प्रस्ताव तयार केला जाईल. जूनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिवांना प्रस्ताव सादर केला जाईल.
पांडे समितीचा अहवाल
परीक्षा केंद्र बदलून कॉपी करताना पकडल्याचा आरोप असलेले लिपिक सुभाष बोरीकर यांची चौकशी करणाऱ्या समितीने कुलगुरूंना सोमवारी अहवाल सादर केला आहे. विधी विभागाच्या प्रमुख डॉ. साधना पांडे, अधिष्ठाता डॉ. बब्बू शेख, डॉ. दिलीप खैरनार यांच्या समितीने बोरीकर यांची चौकशी केली असून हा अहवाल परीक्षा मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.
कमलनयन बजाज केंद्र उभारणार
कॉर्पोरेटसोशल रिस्पान्सिबिलिटी म्हणजेच सीएसआरअंतर्गत राहुल बजाज यांनी विद्यापीठाला दीड कोटी रुपये देण्याचे कबूल केले आहे. या पैशांमध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या केंद्राला कमलनयन बजाज यांचे नाव दिले जाणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...