आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएएस टॉपर इरा सिंघाल रविवारी शहरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शारीरिक अपंगत्वावर मात करून आयएएस परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या इरा सिंघाल रविवारी (२४ एप्रिल ) औरंगाबाद शहरात येत अाहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षा मेळाव्यात त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

कोण आहेत इरा सिंघाल? : इरा सिंघाल यांना लहानपणीच ‘स्कोलिओसिस’ या पाठीच्या कण्याशी निगडित आजारपणामुळे त्यांना अपंगत्व आले. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी संगणक क्षेत्रामध्ये अभियांत्रिकी पदवी तसेच एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. २०१० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची महसूल सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इरा सिंघाल यांची निवडही झाली. परंतु हात वळवता येत नसल्यामुळे त्यांना पदस्थापना देण्यात आली नाही. त्यामुळे इरा यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) मध्ये अपील केले. दोन वर्षांच्या न्यायिक लढाईनंतर त्यांना आयकर विभागात पदस्थापना देण्यात आली. परंतु या पदावर समाधान मानता त्यांनी २०१४ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा दिली. यात त्या देशात प्रथम आल्या.