आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज ईद-उल-फित्र; शहरातील वाहतुकीत बदल, नमाजचे वेळापत्रक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चंद्रदर्शन झाल्यामुळे शुक्रवारी सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाणार आहे. सिटी चौकातील एकखाना मशिदीत गुरुवारी रात्री हिलाल कमिटीचे अध्यक्ष वहिद काका यांनी यासंदर्भात घोषणा केली. चंद्रदर्शनानंतर सर्वांनी एकमेकांना ‘चांद मुबारक’ अशा शुभेच्छा दिल्या.

सिटी चौक, शहागंजमध्ये ईदनिमित्त खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. पैठण गेट, गुलमंडी आणि सिटी चौकातील बाजारपेठ रात्रभर सुरू होती. कटकट गेट आणि किराडपुरा परिसरात दूध मिळत नसल्याने रात्री उशिरापर्यंत येथील नागरिकांची तारांबळ उडाली. हसरूल, जटवाड्यातील डेअरीतून टँकरने दूध मागवण्यात आले.

वाहतुकीत बदल असा : औरंगाबादहून नाशिककडे जाणारी वाहने बाबा पेट्रोल पंप-नगर नाका-ए. एस. क्लब चौक-साजापूर फाटा - करोडी - शरणापूर फाटा - दौलताबाद टी पॉइंट - माळीवाडा यामार्गे जातील. धुळ्याकडे जाणारी वाहने बाबा पेट्रोल पंप - नगर नाका - ए. एस. क्लब चौक - साजापूर फाटा - करोडी - शरणापूर फाटा- दौलताबाद टी पॉइंट - माळीवाडा -कसाबखेडा फाटा - वेरूळमार्गे जातील. औरंगाबादकडून धुळे, वेरूळ, खुलताबादकडे जाणारी हलकी व दुचाकी वाहने बाबा पेट्रोल पंप - नगर नाका - दौलताबाद टी पॉइंट-कसाबखेडा फाटा-वेरूळमार्गे जातील. नाशिककडून औरंगाबादकडे येणारी वाहने कसाबखेडा फाटा-माळीवाडा - आसेगाव - मुंबई हायवे-ए. एस.क्लब - नगर नाका यामार्गे येतील. तसेच धुळ्याहून येणारी अवजड वाहने वेरूळ - कसाबखेडा फाटा - माळीवाडा - आसेगाव-मुंबई हायवे - ए. एस. क्लब-नगर नाका यामार्गे येतील.

नमाजचे वेळापत्रक
छावणी ईदगाह - 9.30, पाणचक्की मशीद - 10.00, काली मशीद सिटी चौक - 9.00, सिटी चौक मशीद - 9.15, दर्गाह मशीद निझामोद्दीन अवलिया शहागंज - 9.15, दर्गाह मशीद शहानूर हमवी उस्मानपुरा - 9.00, जामा मशीद उस्मानपुरा - 9.30, शहागंज मशीद (कलान) - 9.45, गंजेशहिदा मशीद बायजीपुरा - 10.00, मक्का मशीद दिल्ली गेट - 9.00, रेल्वेस्टेशन मशीद - 9.30, रोजाबाग ईदगाह - 9.30, मोतीकारंजा मशीद - 10.00, मशीद शुत्तारी कालीबावडी मोंढा - 8.30, काली मशीद नवाबपुरा - 9.30, उस्मानपुरा ईदगाह - 10.00, शहशोक्ता ईदगाह सातारा - 9.30, मशीद बागशेरजंग चेतनानगर 8.00, मोहम्मदी मशीद 8.30, जान मोहम्मद मशीद हसरूल 8.30, जामा मशीद चिकलठाणा 9.00, रोशन मशीद गारखेडा 9.15