वेरुळ- 'आई वडिलांपासून दूर राहिलेल्या केशवने मिळविले 91 टक्के गुण' हा दैनिक दिव्यमराठीने प्रकाशीत केलेला मथळा म्हणजे केशव घोलप हा गृहत्यागी आहे. इतरही विद्यार्थ्यानी केशवचा आदर्श घ्यावा असे मत स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी वेरुळ येथे बोलताना व्यक्त केले.
वेरूळ येथील गुरुकुलात शिकणाऱ्या केशव घोलप या विद्यार्थ्याची यशोगाथा दैनिक दिव्यमराठीने गुरुवारी प्रकाशित केली होती. यावरून केशवच्या पुढील शिक्षणास सहकार्य म्हणून घाटनांद्रा येथील मनोहर पंडित यांनी केशवला शैक्षणिक साहित्य भेट दिले आहे. तसेच, पुढील शिक्षणासाठी लागणारे पुस्तके, नोट्स व क्लासचा खर्च सचिन घायवट यांनी उचलला आहे. केशवने पुढील शिक्षण येथील गुरुकुलातच घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा निवास, भोजन तसेच इतर खर्च हा बाबाजी संस्थाच करणार आहे.