आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Identity Card Must For The Treatment In Gov. Hospital

घाटीत दाखल होण्यासाठी ओळखपत्राची आता सक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-घाटीरुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आता रुग्णाचे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. कॉलेज काैन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय सर्व डॉक्टरांनी वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभागात हजर राहावे, असेही या वेळी ठरले, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

घाटीत उपचारासाठी रुग्ण दाखल होत असताना सोबतचे नातेवाईक नोंदणी करतात. नोंदणी करताना बऱ्याचदा ऊर्फ नाव नोंदण्यात येते. रुग्णाला घरी सोडताना किंवा मृत्यूनंतर नोंदणीच्या वेळी दिलेलेच नाव कागदपत्रांवर येते. अशा वेळी इतर सर्व कायदेविषयक बाबींमध्ये अडचणी निर्माण होतात. अनेकदा रुग्णाचे नातेवाईक कोर्टात जातात. यामुळे नातेवाईक आणि प्रशासनाचा वेळ वाया जातो. हा प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अपघात विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांनाही ओळखपत्र द्यावे लागणार आहेत. त्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला जाईल. ओळखपत्रांत मतदान कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना किंवा आधारकार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे.
तक्रारीची दखल
बाह्यरुग्णविभागात परिचारिका संघटनेच्या इंदुमती थोरात त्वचारोग विभागात तपासणीसाठी गेल्या होत्या. या वेळी उपस्थित असलेल्या निवासी डॉक्टरने त्यांना खरूज झाला असल्याचे सांगितले. मात्र, थोरात यांना ते मान्य नव्हते. मला असा कुठलाही आजार झालेला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. याविषयी डॉ. येळीकर यांच्याकडे त्यांनी तक्रारही केली. ओपीडीत मुख्य डॉक्टर नसल्याने निवासी डॉक्टर उपचार करतात. मला खरूज नसतानाही डॉक्टरने खरूज झाल्याचे निदान केले. मुख्य डॉक्टर निवासी डॉक्टरांवर कारभार सोपवतात या तक्रारीमुळे डॉक्टरांनी हजर राहावे, हा निर्णय घेतला.
डॉ. कानन येळीकर.