आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • If BJP Government Come Into Power, There Won't LBT Nitin Gadkari

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे सरकार आल्यास एलबीटी रद्द करू, नि‍तीन गडकरी यांचे आश्‍वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात भाजप सत्तेवर आल्यास एलबीटी रद्द करू, असे आश्वासन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी औरंगाबादेतील व्यापा-यांना दिले. औरंगाबाद मध्य मतदारसंघातील भाजप उमेदवार किशनचंद तनवाणी यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना गडकरी म्हणाले, देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून जनतेच्या हिताच्या अनेक कामांना वेग आला. देशातील २.५ कोटी नागरिकांनी जन-धन योजनेत बँक खाती उघडली. बँकिंगच्या माध्यमातून सामान्यांच्या विकासाचे काम सरकार करणार आहे.
राज्यातील रस्त्यांची अवस्था बिकट असून त्या रस्त्यांची दुरुस्ती आणि नवीन रस्ते तयार केले जातील. राज्यात भाजपचे सरकार आल्यास एलबीटी रद्द करण्याचा निर्णय आम्ही आधीच घेतला आहे. सुजलाम् सुफलाम् देश करण्याचे भाजपचे ध्येय असून त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. काँग्रेसने आजवर दलित व मुस्लिमांचा फक्त वापर करून घेतला, असेही ते म्हणाले. या वेळी तनवाणी यांनीही भाषण केले. आपल्यावर करण्यात येत असलेले गद्दारीचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. आपण शिवसेनेचा आतापर्यंत मित्र असलेल्या भाजपमध्येच गेलो आहोत. विधान परिषदेत असताना गडकरी युतीचे नेते होते, आता माझे नेते आहेत, असे सांगत त्यांनी आपली भूमिका विशद केली.