आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्षा संपली, ढग अाल्यास कृत्रिम पाऊस सोमवारपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कृत्रिम पावसाचा प्रयोग सोमवारपासून केला जाणार असून त्यासाठीचे विमानही औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. सी डॉपलर रडारचा प्रवास शिकागो, हाँगकाँग व्हाया मुंबई, औरंगाबाद असा होणार आहे. मंगळवारी हे रडार शहरात दाखल होणार असले तरी सोमवारपासूनच कृत्रिम पाऊस पाडण्याच्या मोहिमेला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली.

दांगट यांनी सांगितले की, कृत्रिम पावसासाठीचे विमान शनिवारी दीड वाजता विमानतळावर दाखल झाले आहे. बंगळुरू येथे हे विमान मॉडिफाय करण्यात आले आहे. सी डॉपलर रडार शिकागोहून निघाले असून ते हाँगकाँगला पोहोचले आहे. सोमवारी रात्री ते मुंबईत पोहोचणार आहे. दीड टन वजनाचे हे रडार आहे. मुंबईत आल्यानंतर लगेच ते औरंगाबादकडे रवाना होणार आहे. त्यासाठी किमान बारा तासांचा अवधी लागणार असून मंगळवारी हे रडार शहरात पोहोचणार आहे. दरम्यान, विमानामध्ये छोटे रडार असते. त्यामुळे त्याच्या आधारे सोमवारपासूनच कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक सुहास दिवसे हेदेखील औरंगाबादमध्ये येणार आहेत. विभागीय आयुक्तालयाच्या इमारतीवर हे रडार बसवण्यात येणार आहे. त्यासाठी छोटे टॉवरही उभारण्यात येणार असल्याचे दांगट यांनी सांगितले.