आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If I Not Get Success, I Will Stope Political Career Raj Thackeray, Divya Marathi

निवडणुकीत अपयश आले तर राजकीय दुकान बंद, राज ठाकरे यांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत मी काही करू शकलो नाही, मनसेला यश मिळाले नाही तर मी हे राजकीय दुकान बंद करून टाकीन, अशी जाहीर घोषणाच पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रचारसभेत करून टाकली.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर गुरुवारी झालेल्या सभेत राज म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासाच्या मी गप्पा मारत नाही. त्याचा आराखडा माझ्याकडे तयार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या चारही पक्षांनी राजकीय विचका करून ठेवला आहे. भाजप नेते व शरद पवार यांनी मिळून हे कारस्थान केले. अनेक महिन्यांपासून त्याचे नियोजन सुरू होते. पवार भाजपच्या नेत्यांना म्हणत होते- तुम्ही युती तोडा पुढील अर्ध्या तासात आम्ही आघाडी तोडतो. झालेही तसेच.
सत्तेच्या लालसेपोटी या पक्षांनी महाराष्ट्राचे खेळणे केले आहे.या पक्षांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयावर जनता हसते. कोणताही आक्षेप घेत नाही आणि लोकांना राग येत नाही म्हणून त्यांचे फावते. धरणात पाणी नसल्यावरून अजित पवारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही त्यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला.