आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Income Increase Then Municipal Corporation To Be Prosperous

उत्पन्न वाढवले तरच मनपा समृद्ध, पालकमंत्री कदम यांनी पालिकेला दिला 'अर्थ'मंत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद मनपाने उत्पनाचे स्रोत वाढवल्यास कोणासमोरही हात पसरावा लागणार नाही. मनपा समृद्ध होईल. सर्व विकास कामेही मार्गी लागतील. मात्र मनपाचे याकडे दुर्लक्ष असून मनपाचा कारभार म्हणजे ‘काखेत कळसा अन् गावाला वळसा’ अशी असल्याची बोचरी टीका जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केली. मनपाचे तत्कालीन आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी समांतरचा करार चुकीच्या पद्धतीने केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुभेदारी विश्रामगृहावर रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

विधान परिषदेवर विजय मिळवल्यानंतर प्रथमच शहरात आलेल्या कदम याचे चिकलठाणा विमानतळ तसेच सुभेदारी विश्रामगृहावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार संदीपान भुमरे, जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, अण्णासाहेब माने, बाळासाहेब थोरात, राजू वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार रमेश मुनलोड यांनी त्यांचे स्वागत अभिनंदन केले.

महापालिकेची वसुली फक्त १८ टक्के : औरंगाबादमनपाची वसुली फक्त अठरा टक्के आहे. त्यामुळे कुठलाही प्रकल्प मार्गी लावायचा विषय आला की मनपाकडे निधीची कमतरता असते. केंद्र-राज्य शासन निधीही देत असले तरी इथला कारभार थोडा वेगळाच आहे. शहरातल्या ६० ते ६५ टक्के घरांना अद्याप करच लावला नाही. हे लोक कर भरण्यास तयारआहेत. मात्र मनपाचे दुर्लक्ष असून हा प्रकार म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी स्थिती आहे. मनपाने करवसुलीवर लक्ष केंद्रित केले तर वर्षाकाठी त्यातून ५०० कोटी रुपये मिळू शकतील. त्यामुळे समांतरसाठीचा लागणारा निधी यामधून उभारला जाऊ, शकतो असे मतही त्यांनी व्यक्त केले.

कचरापेट्यांचे पैसे अखर्चित
मनपालाकचरा पेट्यांसाठी नियोजन विभागातून निधी मिळवून दिला. मात्र हा निधी मनपा खर्चच करत नाही. निधी देऊन चार महिने झाले आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत या कचरा पेट्या कोणत्याही परिस्थितीत आल्या पाहिजेत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.

एसआरएसंदर्भात लवकरच मुंबईत बैठक
मनपानिवडणुकीच्या वेळेस मुंबईच्या धर्तीवर औरंगाबादेत एसआरए (झोपटपट्टी पुनर्वसन योजना) राबवण्याची घोषणा कदम यांनी केली होती. याबाबत विचारले असता लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची मी मुंबईला बैठक घेऊन विषय मार्गी लावणार आहे. शहरात ५० पेक्षा अधिक झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे तेथे ही योजना लागू झाल्यास शहर स्मार्ट होण्यास मदत होईल, असे पालकमंत्र्यानी सांगितले.

डिपीडीसीचा सर्व निधी खर्च करणार

जिल्हानियोजन समितीतील २४२ कोटी पैकी केवळ ९० कोटी खर्च झाले आहेत. त्यामुळे केवळ तीन महिन्यांत पैसे खर्च करण्याचे आ‌व्हान आहे. यावर पालकमंत्री म्हणाले की यापूर्वी नियोजन अधिकाऱ्यांनी नियमबाह्य काम करून निधी खर्च होऊ नये यासाठीच प्रयत्न केला. त्यांना हटवण्यात आले आहे. दोन दिवसांत मुंबईत बैठक घेवून १५ दिवसांत याबाबतच्या निविदा काढून सर्व निधी खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.