आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एमआयएम'ची सत्ता आल्यास पाच रुपयांत जेवण देऊ : ओवेसी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमआयएमची महापालिकेत सत्ता आल्यास रेल्वेस्थानक, बसस्थानक, रुग्णालयांमध्ये पाच रुपयांत जेवण देऊ, अशी घोषणा एमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केली. आमखास मैदानावर शनिवारी रात्री त्यांची जाहीर सभा झाली.

ओवेसी म्हणाले, आतापर्यंत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला मते दिली. एकदा आम्हाला महापालिकेची सत्ता द्या. शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू. जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असताना येथे पर्यटक का येत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ठाकरेंना आव्हान
आम्हाला भाजप अाणि मोदींची भीती दाखवली जाते. एक नव्हे हजार मोदी आले तरी मी त्यांना घाबरत नाही, असे सांगतानाच त्यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा आव्हान दिले. सिंह कधी मातोश्रीच्या बाहेर निघालाच नाही. आम्ही नांदेड, औरंगाबादला आलो, मुंबईत आलो. तुम्ही हैदराबादला येऊन दाखवा, असे ते म्हणाले.

मोदीच देशाचे दुश्मन
ओबामा येतात आणि आपल्या देशाबद्दल अभद्र बोलून जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना चहा पाजतात. देशाबद्दल जेव्हा ओबामा बोलून गेले तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणारा एकही मर्द शिवसेना, बजरंग दलात नव्हता का, असा सवाल करून मोदी हेच देशाचे दुश्मन आहेत, अशी टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले, मोदी बस तर उद्धव ठाकरे बसतात. उठ म्हणतात तर उठतात. त्यांचा नेता सकाळी सात वाजता शिवसेनेतून भाजपत जातो आणि दहा वाजता कंेंद्रीय रेल्वे मंत्री बनतो. याला म्हणतात का सिंह?
बातम्या आणखी आहेत...