आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Shiv Sena Become Strong Then Chop My Legs Rajendra Janjal

शिवसेना मजबूत होणार असेल तर माझे दोन्ही तंगडे तोडा! राजेंद्र जंजाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा व देवळाई या दोन वाॅर्डांतील पराभवाचे खापर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांच्यावर फोडत खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल जंजाळ यांचे तंगडे तोडेन असे वक्तव्य केले होते. त्याची बातमी प्रसिद्ध होताच गुरुवारी सकाळी सात वाजता जंजाळ खैरे यांच्या जालाननगर येथील निवासस्थानी पोहोचले. पक्ष मजबूत होणार असेल तर माझे दोन्ही तंगडे तोडा, असे सांगण्यासाठी ते गेले होते. मात्र, खैरे दिल्लीला गेले असल्याने त्यांच्यातील संघर्ष टळला.

जंजाळ अर्धा तास खैरेंच्या घरासमोर उभे राहून त्यांच्याशी मोबाइलवरून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. परंतु संपर्क झाला नाही. आता जेव्हा खैरे भेटतील, तेव्हा त्यांच्यासमोर माझे दोन्हीही तंगडे मी ठेवणार असल्याचे जंजाळ यांनी सांगितले.
सायंकाळी महापालिकेत पत्रकारांशी बोलताना जंजाळ म्हणाले की, खैरेंनी देवळाईतील मतांची आकडेवारी तपासून संघाच्या लोकांनी कोणाला कधी मदत केली ते तपासून घ्यावे. साताऱ्यात खैरेंचे चिरंजीव ऋषिकेश प्रचारात होते. तेथेही पराभव झाला. मग खैरे कोणाचे तंगडे तोडणार? मुळात देवळाईत प्रचारासाठी कोणी बोलवण्याची वाट पाहण्याची गरजच काय होती?

पुढे वाचा...खैरे म्हणाले, हा कसला शिवसैनिक?, जैस्वालांकडे ग्रामीणची जबाबदारी देण्याची शक्यता