आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Without Permission The Tree Cut , Then 7 Years Sentence

परवानगी शिवाय झाड तोडले तर 7 वर्षे शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमध्ये झाडे तोडून शेकडो निष्पाप पक्ष्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी २० ऑगस्ट रोजी मूकमोर्चा श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे. सकाळी आठ वाजता रेल्वेस्थानक परिसरातील ऑटो पार्किंगमधून मूक मोर्चाला सुरुवात होईल. रेल्वेस्टेशन परिसरातील ऑटो पार्किंग ते तोडलेले झाड, असा मूकमोर्चा निघेल. तिथेच श्रद्धांजली सभा होईल. यात पक्षिमित्र, पर्यावरणप्रेमी संघटना, सामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वुई फाउंडेशन, ग्रीन औरंगाबाद फोरम, गरवारे कम्युनिटी सेंटर, शिवनेरी मित्रमंडळ, एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशन सेंटर, इको नीड फाउंडेशन, पोलिस-सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी "डीबी स्टार'चे प्रमुख रूपेश कलंत्री, मेघना बडजाते, प्रीती शाह यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वेस्थानकातील जुने चिंचेचे झाड तोडून शेकडो बगळ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रेल्वे प्रशासनावर ठोस कारवाई करण्याच्या हालचाली वन विभाग आणि महापालिकेने सुरू केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने वृक्षतोडीसाठी किंवा फांद्या तोडण्यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष सुरक्षा आणि संरक्षण कायदा १९७५ नुसार महापालिकेकडून परवानगी घेणे आवश्यक होते, परंतु रेल्वेने तशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. िवना परवानगी झाड तोडल्यास वर्षे शिक्षा होऊ शकते.

"रेल्वे प्रशासनाने घेतला बगळ्यांचा जीव' या मथळ्याखाली "दिव्य मराठी'ने वृत्त प्रसिद्ध करून मूक बगळ्यांच्या हत्या प्रकरणाला वाचा फोडली. आठ दिवसांत रेल्वेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचना उपवनसंरक्षक गिरिपुंजे यांनी मुख्य वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नाकर नागापूरकर यांना दिली.