आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान महिन्यातील इफ्तार महागला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सोमवारपासून सुरू झाला. उपवास सोडण्यासाठी फळांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने सर्वच फळांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. याचा फटका रोजेदार बांधवांना बसत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा फळांच्या किमतीत दुप्पट ते तिप्पट वाढ झाली असून इतर खाद्यपदार्थांचे भावही दुपटीने वाढले आहेत.

दिवसभर उपवास ठेवल्यानंतर सायंकाळी फळांचे सेवन करून इफ्तार केलां जातो. यासाठी खजूर, सफरचंद, केळी, अननस, पपई, टरबूज, चिकू आदी फळांचा वापर होतो. या वर्षी जुलै महिना उजाडला तरी मान्सून सक्रिय झाला नाही. यामुळे महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून फळांच्या किमतीही दुपटीने वाढल्या आहेत. साधारण 60 रुपये किलो भावाने मिळणारा साधा खजूर यंदा 80 ते 100 रुपयांवर पोहोचला आहे. चांगल्या प्रतीचा खजूर 200 ते 300 रुपये किलोने मिळत आहे. सफरचंद 150 ते 200 रुपये किलो, केळी 40 रुपये डझन, खरबूज 50 रुपये किलो, टरबूज 30 रुपये, अननस 60 रुपये प्रतिनग या भावाने मिळत आहे. यामुळे मध्यमवर्गीय नागरिकांना फळे खरेदी करणे दुरापास्त झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फळांची आवकही कमी आहे. यातच पाऊस नसल्यामुळेही किमती वाढल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली.
मागील वर्षी 100 रुपयांमध्ये इफ्तारसाठी लागणारी विविध फळे खरेदी करता येत होती. यंदा यासाठी 150 ते 200 रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय तळलेल्या पदार्थांच्या किमतीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. समोसे, नुडल्स, फ्राय राइस, कंटकी, फालुदा, खीर आदी पदार्थ्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे इफ्तारीतून फळांचे प्रमाण मात्र कमी झाले आहे.